कुत्रा चावल्यास चुकूनही करू नका दुर्लक्ष अन्यथा भोगावे लागतील हें दुष्परिणाम पहा धक्कादायक

0
2614

मुंबई: रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (जसे की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. याच रोगास जलसंत्रास असेही नाव आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात.

रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो

रेबिज (पिसाळणे) हा रोग अत्यंत घातक व महाभयंकर आहे. हा आजार मानवाला, सस्तन पशुंना (मुख्यतः कुत्र्यांना) झाला, तर खूप हाल होऊन त्यांना मरण येते. रेबिज रोगावर कोणतेही खात्रीलायक औषधपाणी नाही, हे लक्षात ठेवा. रेबिज होऊ नये, यासाठी प्रतिबंधक लस टोचून घेणे, हाच एकमेव इलाज आहे.

साधारणपणे २ ते १२ आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी रोग्यात लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो व जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्वा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो.

रेबिज हा रोग अतिसूक्ष्म विषाणूंपासून (व्हायरस) होतो. हा विषाणू फक्त हाय-पॉवर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्राखालीच दिसतो. हा रोग मज्जासंस्थेशीच (नर्व्हस सीस्टिम) निगडित असल्याने तो रक्तात दिसत नाही. मज्जारज्जुमार्फत (चेता संस्था) हा विषाणू ‘मेंदूत’ पोहोचल्यानंतर शरीरात त्याचा प्रसार झपाट्याने होतो. या रोगाची लक्षणे दिसण्यास तीन दिवस ते चारशे दिवसांपेक्षाही अधिक अवधी लागू शकतो. (याला ‘इनक्युबेशन पिरीअड’ म्हणतात)

रेबिजचा प्रसार कुत्र्याबरोबरच इतर पशूंच्या आणि मानवाच्या लाळेमार्फत होतो. म्हणून घरातील/बाहेरील कुत्र्या-मांजराचे पापे-मुके घेऊ नयेत. घरातील पाळीव कुत्र्या-मांजराला दर साडे-पाच महिन्यांनी ‘रेबिज प्रतिबंधक लस’ न चुकता, न विसरता द्यावी. प्राण्यांना लस देताना ती थंड अवस्थेत असली पाहिजे. कोणत्याही कुत्र्याने किंवा मांजराने चावले असता किंवा ओरबाडले असता, ती जागा साबणाने 8 ते 10 वेळा घासून-पुसून स्वच्छ करावी. (तो साबण कपड्याचा असेल तर उत्तम.) त्यावर टिंक्चर आयोडिन, अल्कोहोल, संपृक्त डेटॉल भरपूर प्रमाणात लावावे. त्या जागेवर कापूस, चिकटपट्टी तसेच बँडेज बांधू नये. चाव्यामुळे किंवा ओरबडण्यामुळे खोलवर जखम झाली असेल, तर वरीलप्रमाणे ती जखम स्वच्छ करून जखमी व्यक्तीला ताबडतोब (2 ते 3 तासांत) कोणत्याही शासकीय, महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात न्यावे.

प्राणी चावल्याने जखम झाल्यावर लवकरात लवकर साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास त्यावर अँटिसेप्टिक मलम लावावे व त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीजवर पीईपी (पोस्ट एक्‍स्पोजर प्रोफायलॅक्सिस) ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घेणे योग्य आहे.

पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशंटने जखम व्हायच्या आधीच लसीकरण घेतले असेल त्याने इम्युनोग्लोबुलीनचा डोस नाही घेतला तरी चालतो. त्याने जखम झाल्यानंतरचे लसीकरण जखम झाल्यावर व दोन दिवसांनी घ्यावे.

घरातील पाळीव कुत्र्यांची किंवा मांजराची वागणूक नेहमीच्या माणसांबरोबर थोडीही वेगळी दिसली, तरी ताबडतोब नजीकच्या पशुपक्षी डॉक्टारांशी संपर्क साधावा. मेंदूच्या जवळ (म्हणजे चेहरा, मान, खांदे) जखम असेल, तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यावा. जखम स्वच्छ करून घ्यावी.

वयाचे तीन महिने झाल्यानंतर दर सहा महिन्यांनी आपल्या कुत्र्याला रेबीज ची लस द्या. पाळीव कुत्र्याला कुठल्याही प्रकारे भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका. कुत्र्यात वेगळे असे काही जाणवल्यास पशुवैद्यांशी संपर्क साधा. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास संतती नियमन शस्त्रक्रिया करा . वटवाघळांपासून आपल्या कुत्र्याला दूर ठेवावे.

गोठ्यातील गायी-गुरांना, बाहेरील वा घरातला कुत्रा चावला, तर त्याची योग्य दखल वेळीच घ्या. नाही तर महागात पडेल. वटवाघळापासूनही दक्ष राहावे.

रेबीज हा रोग कोणत्याही उष्ण रक्ताच्या प्राण्याला होऊ शकतो, उदा० माणूस. असे ही सिद्ध झाले आहे की हा रोग पक्ष्यांमध्ये सुद्धा दिसून येतो.

हा रोग थंड रक्ताच्या प्राण्यांमध्ये दिसून आलेला आहे. वटवाघळे , माकडे, कोल्हे, गाईगुरे, लांडगे, कुत्री, मुंगूस अशा काही प्राण्यांपासून माणसाला रेबीजचा धोका संभवतो. इतर जंगली प्राण्यांमुळे सुद्धा रेबीज होऊ शकतो. खारी, hamsters, guinea pigs, उंदीर ह्या प्राण्यांमध्ये अगदी क्वचितच रेबीज आढळतो.

रेबीजचा जीवाणू प्राण्याच्या नसांमध्ये आणि लाळेत आढळतो. हा रोग बहुधा प्राण्याच्या चावण्यामुळे होतो. बऱ्याच वेळा प्राणी चिडून हल्ला करतो आणि चावा घेतो.

माणसांमधून रेबीजचा प्रसार फारच क्वचित होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here