जगातील सर्वात श्रीमंत राजा ! जो सोन्याच्या विमानातून करतो प्रवास !

0
303

ब्रुनेई चे सुलतान असलेले हसनल बोल्किया यांचं नाव जगातील सर्वात धनवान व्यक्तींमध्ये घेतलं जातं. याच कारण आहे ब्रुनेई देशामध्ये मोठ्या प्रमाणावर असणारे तेल साठे. जगात धनवान व्यक्तींची कमी नाहीये पण सुलतान हसनल बोल्किया यांची गोष्टच वेगळी आहे. ते आणि त्यांचा परिवार हे केवळ सोन्याच्या गाडी आणि विमानातून प्रवासच करत नाहीत तर त्यांच्याकडे एकूण ६००० लग्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. ज्यामध्ये जगातील सर्वात महागड्या गाड्यांचा समावेश होतो जगातील सर्वात मोठे कार कलेक्शन म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याचा मिळाला होता किताब 

अनेक तेल साठ्यांचे मालक असणारे सुलतान हसनल बोल्किया यांना १९८० मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याचा किताब मिळाला होता. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती ७०,००० करोड रुपये इतकी होती परंतु १९९० मध्ये अमेरिकन बिजनेसमन बिल गेट्स यांनी तो मान बळकावला आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.

दिवसाला करतात एवढी कमाई !

सुलतान ऑफ ब्रुनेई या नावाने ओळखले जाणारे हसनल बोल्किया यांची एकूण संपत्ती १.२४ लाख करोड रुपये इतकी आहे आणि त्यात दरदिवशी ९० लाख ते १.५ करोड रुपयांची भर पडते.

महागड्या गाड्यांचे आहेत शौकीन 

सुलतान हसनला यांना महागड्या गाड्यांचा शौक आहे. एवढंच न्हवे तर जगातील सर्वात मोठ्या कार कलेक्शनचे ते मालक आहेत. त्यांच्या ताफ्यामध्ये ३०० फरारी, १९७ ऑडी, ९०० मर्सिडीज, ५०० हुन अधिक रोल्स रॉयस, ६०० बेंटले. ४०० बीएमडब्ल्यू आणि ५७६ लॅम्बोर्गिनी चे कलेक्शन आहे. याशिवाय त्यांच्याकडे रोल्स रॉयस कंपनीने खास त्यांच्यासाठी तयार केलेली कस्टम कार देखील आहे जी पूर्णपणे सोन्याने बनवलेली एक बॉम्ब प्रूफ कार आहे.

जगातील सर्वात मोठा सोन्याचा महाल 

सुलतान हसनल बोल्किया हे १७८८ खोल्या असलेल्या एका आलिशान महालात राहतात या महालाचे छप्पर हे पूर्णपणे सोन्याने मढवलेले आहे. या घराच्या बांधकामात जेवढा जास्त सोन्याचा वापर करता येईल तेवढा वापर करण्यात आला आहे. इतकंच काय तर या महालातील बाथरूम्स सुद्धा सोन्याचे आहेत. या महालाची पूर्ण किंमत सुमारे ६०,००० कोटी इतकी सांगितली जाते. या महालाला जगातील सर्वात महागड्या वास्तूंपैकी एक मानलं जातं. 

सोन्याच्या विमानातून करतात प्रवास 

सुलतान हसनला यांना आपल्या तेलाच्या व्यवसायामुळे अनेक देशांमध्ये विमान प्रवास करावा लागतो यासाठी त्यांच्याकडे स्वतःचे एक बोईंग 747-400 विमान आहे. या विमानाची खासियत म्हणजे हे पूर्णपणे सोन्याने मढवलेले आहे. हे विमान पण एखाद्या महालापेक्षा कमी नाहीये. या विमानात सुलतान यांना लागणाऱ्या सर्व वस्तूंची सोया केली गेलेली आहे.

तर कशी वाटली तुम्हाला ‘सुलतान ऑफ ब्रुनेई – हसनल बोल्किया’ यांची रॉयल लाईफ ? कंमेंट मध्ये नक्की सांगा !

आणि आमचे फेसबुक पेज Marathi News Trend लाईक करायला विसरू नका ! जर तुम्हाला हे आर्टिकल आवडला असेल तर खाली दिलेल्या Facebook आणि Whatsapp च्या बटनांवर क्लिक करून तुम्ही आपल्या मित्रांसोबत शेयर करू शकता, धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here