ना सचिन ना लारा ! सर्वाना भारी पडला रोहितचा झणझणीत दरारा ! 

0
305

जगात असेही खेळाडू असतात , ज्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षराणे नोंदले जाते . हा क्षण इतका अमूल्य असतो की , लोकांच्या आठवणीत हा क्षण कायम असतो. क्रिकेट मध्ये असे भरपूर क्षण टिपले गेले आहेत की लोकांनी त्यावर खुप टाळ्या वाजवल्या आहेत आणि त्याचा आनंद सुद्धा लुटला आहे . सचिन चे शतक असो किंवा शेन वॉर्न ने केलेली गोलंदाजी असो. हे क्षण लोकांच्या आठवणीत कायम राहतील . असाच एक कारनामा भारतीय फलंदाज रोहित शर्मा याने केला आहे . याचे खास कारण असे आहे की , हा  कारनामाँ आणि विश्वविक्रम कोणाच्या सुद्धा नावावर नाही . हा विक्रम करणारा रोहीत शर्मा एकमेव आहे आणि असणार. 

रोहित शर्मा चा खेल कायम तारीफ करण्याच्या लायकीचा असतो. परंतु काही दिवसांपूर्वी लोक त्याला एकदिवसीय मॅच च्या हरण्याचे कारण ठरवत होते. पण आज झालेल्या मॅच मध्ये रोहित ने खेळून त्या लोकांचे तोंड बंद केली आहेत. आजच्या मॅच मध्ये श्रीलंका विरोधात त्याने असे प्रदर्शन दाखवले आहे की , श्रीलंकेचे सर्व खेळाडू डोकं धरून बसली होती . श्रीलंकाचे खेळाडू इतके वैतागले होते की त्यांनी टाकलेल्या प्रत्येक चेंडूवर रोहित धावांचा पाऊस पडत होता , वैतागलेल्या श्रीलंका गोलंदाजांना हे सुद्धा काळात नव्हते की त्याला कशा प्रकारचे चेंडू टाकूया आणि कसे आउट करूयात. 

आज रोहित ने झनझणीत फलंदाजी करत 151 चेंडूचा 12 षटकार आणि 13 चौकार मारून त्याचा करियर मधील 3री एकदिवसीय 200 शतकी पारी खेळली आहे. असे रेकॉर्ड करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे . एवढंच नाही तर रोहित शर्माने अजून एक गोष्ट साध्य केली आहे . आजच्या 2 वर्षापुर्वी रोहित ने त्याच्या मैत्रिणीसोबत लग्न केले होत्व आणि आजच्याच दिवशी त्याने हा सगळ्यात मोठा विश्वविक्रम केला आहे . हे खास रेकॉर्ड त्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बनवले आहे . 

हे रेकॉर्ड बनवून रोहित ने त्याच्या पत्नीस मोठे गिफ्ट ढिले आहे. जेव्हा त्याने आपले 3रे एकदिवसीय 200 रन्स काढले तेव्हा त्यांनी त्याचा पत्नीकडे इशारा करून दिला हे गिफ्ट दिले आणि हे बघताच तिच्या डोळ्यात पाणी आले. हा एक सुंदर आणि अनमोल क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे जो प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here