पहिल्यांदा ‘सेक्स’करताना पुरूषांनी ठेवावे या गोष्टींचे भान..!!

0
5328

 पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या कल्पना असतात. मात्र प्रत्यक्षात वेगळेच घडू शकते. कधी-कधी अपुऱ्या माहितीमुळे आपल्याला काय करावे आणि काय करू नये हेच कळत नाही. यामुळे ऐकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते.

त्यामुळे पहिल्या सेक्सदरम्यान पुरुषांनी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.

१) सुसंवाद

सेक्स करण्यापूर्वी बऱ्याच जोडप्यांमध्ये संवाद नसल्याने ऐनवेळी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे एकमेकांशी सुसंवाद साधा. शारीरिक संबंधाविषयी एकमेकांच्या अपेक्षा जाणून घ्या. तुमच्या मनात असणाऱ्या सर्व शंका ऐकमेकांना सांगा. म्हणजे पहिल्यांजा सेक्स करताना अवघडलेपण जाणवणार नाही.

२) तो क्षण जगा

चित्रपटात किंवा पॉर्न फिल्ममध्ये दाखवल्या जाणार्या गोष्टी हे फक्त रंजित आणि काल्पनिक स्वरूप असते. म्हणून त्याचे अनुकरण करणे टाळा आणि तुमच्या साथीदारासोबत केवळ ‘त्या’ सुंदर क्षणांचा सुखद अनुभव घ्या.

३) कंडोम विसरू नका

पहिल्यांदा सेक्स करताना सुरक्षादेखील महत्त्वाची आहे. बऱ्याचवेळा उत्साहाच्या भरात आपण सुरक्षेचा विचार करतच नाही, परिणामी लैंगिक आजार किंवा अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते.

४) गैरसमज

पहिल्यांदा संभोग करताना प्रत्येक स्त्रीला रक्तस्त्राव होतोच असे काही नाही. कारण स्त्रीच्या योनीमार्गाच्या मुखाशी असलेला ‘हायमेन’ अतिशय नाजुक पडदा असतो. तो पोहणे, धावणे, सायकल चालवणे, खेळणे यासारख्या व्यायाम प्रकारातूनही अगदी सहज फाटू शकतो. तर काही जणींमध्ये हा पडदा जन्मजातच नसतो. त्यामुळे रक्तस्त्रावाचा संबंध तिच्या पावित्र्याशी लावणे टाळा.

५) प्रणयाला वेळ द्या

पुरूष प्रणयाला वेळ देत नाही ही तक्रार बर्याच स्त्रीयांची असते. प्रत्यक्षात संभोग करण्यापूर्वी प्रणय करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. चुंबन, स्पर्श, ओरल सेक्स यासारख्या गोष्टींना देखील पुरेसा वेळ द्यायला हवा.

६) सेक्स दरम्यानचा त्रास

काही वेळेस पहिल्यांदा सेक्स करताना त्रास होण्याची शक्यता असते. तुमचे शिश्न संवेदनशील असू शकते किंवा कदाचित तुमच्या साथीदाराला वेदना होऊ शकतात. पहिल्या सेक्सच्या वेळेस वेदना होणे हे अगदी सामान्य आहे.

या गोष्टींचे भान ठेऊन तुम्ही प्रणय केला तर तुम्हाला नक्कीच परमोच्च क्षणाचा आनंद लुटता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here