पुरस्कार सोहळ्यात सईने तिच्या बोल्ड अंदाजाने वेधले सर्वांचे लक्ष ! पहा फोटॊ होताय वायरल

0
980

मराठी चित्रपटसृष्टीला ग्लॅमर आणणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच ‘स्टाईल आयकॉन’ राहिली आहे. तरुणाईने तिचे अनेक ट्रेंड्स फॉलो केलेत आणि तिचे फॅशन स्टेटमेंट्सही नेहमीच चर्चेचा विषय ठरलेत. हिंदी, तामिळ चित्रपटातूनही तिने तिचा चाहतावर्ग निर्माण केला.

तिच्या अशा उत्कृष्ट कामगिरीला गौरविण्यासाठी या वर्षीचा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ हा पुरस्कार एक खास निमित्त ठरले. या पुरस्कार सोहळ्यात सईने तिच्या बोल्ड अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधले.

यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’मध्ये सईने दोन पुरस्कार पटकावले आहेत. विशेष म्हणजे सईला या पुरस्कारासाठी तीन विभागात नामांकन मिळाले होते. त्यात ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ या चित्रपटासाठी महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री, ‘फॅमिली कट्टा’ चित्रपटासाठी फेव्हरेट सहाय्यक अभिनेत्री आणि ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ यासाठी तिला नामांकने होती. त्यातील ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ आणि ‘महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री’ यासाठी तिला पुरस्कार मिळाले आहेत.

डबल धमाका असे दोन अवॉर्ड मिळाल्याबद्दल सई म्हणाली की, ‘हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे. मी खूप खूश आहे की, प्रेक्षकांनी ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ चित्रपटातील माझ्या भूमिकेवर प्रेम केलं आणि महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री म्हणून गौरवलं.

तसेच महाराष्ट्राचा फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्यानंतर माझी जबाबदारी आणखी वाढते आणि मला हे दोन पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल माझ्या चाहत्यांना खूप खूप धन्यवाद’.

प्रेक्षक आणि समीक्षकांनी केलेलं कौतुक आणि अभिनयातील कुशलता यामुळे सईने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे प्रेम यामुळे तिच्यासाठी २०१८ चे खूप खास ठरलं आहे. तसेच सध्या सई, समित कक्कड दिग्दर्शित ‘राक्षस’ चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here