प्रियकराकडे प्रेयसीची अजब मागणी माझ्या वडिलांना ठार मारलं तरच करेल लग्न !थरकाप उडवणारी एक घटना

0
57

लखनौ – उत्तर प्रदेशातील शामलीमध्ये थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. इयत्ता दहावीमध्ये शिकणा-या एका मुलाला आपल्या गर्लफ्रेंडच्या वडिलांची हत्या केल्याच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या हत्याकांडमध्ये स्वतः त्यांची मुलगीदेखील सहभागी होती.

इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आपल्या गर्लफ्रेंडच्या वडिलांची हत्या केली आहे. दरम्यान, गर्लफ्रेंडच्याच सांगण्यावरुन तिच्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. ”आधी माझ्या वडिलांना ठार मार, तेव्हाच लग्न करेन’, असे या मुलीनं आरोपी मुलाला सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

ज्या हत्यारानं विद्यार्थ्यानं गर्लफ्रेंडच्या वडिलांचा जीव घेतला, ते हत्यारदेखील मुलीनंच त्याला पुरवल्याची गंभीर बाबदेखील पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या हत्याकांडप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here