बर्फाच्या डोंगराला आदळून नाही तर या कारणामुळे बुडाले होते टायटॅनिक जहाज

0
346

तुम्ही टायटॅनिक पिक्चर पाहिलाच असेल , त्यात हिमनग म्हणजेच ( बर्फाच्या डोंगराला ) जहाज आदळून बुडल्याचे कारण दाखवले आहे. पण ते खोटं असल्याची बातमी समोर आलीये , या गोष्टीला १०० वर्षाहून अधिक काळ उलटून गेला आहे. कितीतरी मजली जहाज समुद्रात बुडून गेलं आणि जाता जाता एकुण २,२२७ प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी १,५१७ लोकांना जलसमाधी देऊन गेलं. शेवटी जिला वाचवलं गेलं तीच नाव Millvina Dean होत , जिचा मृत्यू ३१ में २००९ साली झाला , जेव्हा हि घटना घडली तेव्हा ती फक्त २ महिन्यांची होती… टायटॅनिक जहाजावर एकूण ९ कुत्रे होते यातील फक्त दोघांचे प्राण वाचले, Pomeranian आणि दुसरा Pekinese अशी या कुत्र्यांची जात होती…

टायटॅनिक वर छापल्या गेलेल्या नवीन पुस्तकात असे नमूद केले आहे कि हे जहाज बर्फाला आदळून नाही तर चालकाच्या चुकीमुळे बुडाले होते , एवढेच नाही तर पुस्तकात हे पण नमूद आहे कि जहाज आदळल्यानंतर सुद्धा सर्व प्रवाशांचे प्राण वाचले जाऊ शकत होते…आता पर्यंत हाच समज होता कि १४ एप्रिल १९१२ ला जेव्हा हि दुर्घटना झाली तेव्हा जहाज खूप जलद गतीने पुढे जात होत , आणि या मुळे चालकांना बर्फाचा डोंगर दिसू शकला नाही , त्यामुळे जहाज बुडाले… पण हे खरं कारण नाहीये तर या मागे चालक दलाची चुक आहे.

हा खुलासा टायटॅनिक वर छापल्या गेलेल्या ‘गुड ऍज गोल्ड’ या पुस्तकात आहे. या पुस्तकात हे पण नमूद केले आहे कि चालक दलाची इच्छा असती तर हि दुर्घटना सहज टळू शकली असती… बर्फाचा डोंगर समोर दिसत असला तरी त्यांच्याकडे बराच वेळ होता हि दुर्घटना टाळण्यासाठी. पण घाबरा घुबरा झालेल चालक दलाने नेमके डोंगराच्या दिशेने जहाज फिरवले , आणि राहिलेला वेळही हातातून निघून गेला…१० एप्रिल १९१२ रोजी 

इंग्लंडमधील साउथहँप्टन येथून हे जहाज न्यूयॉर्क शहराकडे सफरीला निघाले.पण चालकांच्या बेसावधपणा मुळे जहाजाला जलसमाधी मिळाली… असं बोललं जायचं कि हे जहाज कधीच बुडू शकत नाही , टायटॅनिक वर दोन प्रकारचे स्टियरिंग होते , जहाजावर एका दलाच्या माणसांना एका स्टियरिंगची तर दुसऱ्या दलाच्या माणसांना दुसऱ्या स्टियरिंगची माहिती होती, पण अचानक अशी वेळ आल्यामुळे दोन्ही दल वेगवेगळ्या दिशेला काम करू लागले आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले…

टायटॅनिक बनवणारी कंपनी व्हाइट स्टार लाइनचे चेयरमॅन यांनी टक्कर झाल्यानंतर जहाजाच्या मेन कॅप्टनकडे आग्रहाने सांगितले कि जहाज हळू हळू पुढे जाऊदया… जवळ जवळ १० मिनिट चालल्यानंतर जहाजात झपाटयाने पाणी भरू लागले , त्यामुळे जहाज लवकर बुडून गेले. जर जहाजाला टक्कर झाल्या नंतर पाण्यात स्थिर उभे केले असते तर खूप तासांनंतर जहाज पाण्यात बुडाले असते , ज्यामुळे चार तासांच्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या बोटीने मदत केली असती आणि १५१७ लोकांचे प्राण वाचले असते…
जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याची प्रमुख कारणे –
♦ जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील ( ११७८ ) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या.
♦ टायटॅनिक वरील बरयाच जणांना घटनेचे गांभिर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भुमिका घेतल्याने सुरवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या.अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवु शकले.

♦ टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यु येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here