भारतात जिथे तिथे Oppo आणि Vivo चे होर्डींग्स का दिसतात ? जाणून घ्या यामागच कारण !

0
1174

सध्या कुठेही जा उठसुठ एक तरी Oppo/Vivo चं बँनर तरी दिसतं किंवा टिव्ही लावली की त्यांची जाहीरात दिसते..त्यात अजुन भर म्हणजे साधं फेसबुक लॉगीन केलं तर त्याच्यातही त्यांचीच जाहीरात…सर्वजण जाहीरात करत असतात पण इतकीही नाही किराणा दुकानावरही ओप्पो विवो चे बँनर दिसावेत ?

याचविषयी थोडी माहीती काढली जी या लेखातुन तुमच्यासमोर शेअर करतोय..

ओप्पो आणि वीवो यांचं जाहीरातीच बजेट आहे जवळपास 2200करोड..(यावर किती झिरो असतात मोजुन बघा) हे बजेट सँमसंग च्या जाहीरात बजेटच्या आसपास आहे. आता एवढं मोठं भारी बजेट असल्यावर जाहीरात तर जोरातच होणार ना, no dobut

सँमसंग वालेही भरपुर जाहीरात पण ते त्यांच्या फोनची विक्री व्हावीत म्हणुन करतात.. ओप्पो वीवोचा प्लँन थोडं वेगळा आहे.. त्यांनी भारतीय लोकांची मानसिकता बघुन जाहीरात करणं सुरु केलंय. जेव्हा सतत आपल्यासमोर एखादी गोष्ट नेहमी नेहमी दिसत असते तेव्हा ती आपल्या डोक्यात फिट होते आणि ओप्पो वीवोवाले हेच करताय, म्हणजेच वोकांच्या डोक्यात ओप्पो वीवो फिट करुन द्यायचे ज्यामुळे त्यांनी दुसर्या कोणत्या फोनकडे बघुच नये. (आणी दुर्दैव असं की ते यात यशस्वी झालेत)
कोणी फुकट स्वताच्या दुकानावर बोर्ड लावेल का ?
– आजीबात नाही, ओप्पो विवो च्या प्रत्येक बोर्ड ला दुकानावर लावण्याचे कंपनी पैसे देते, जेवढे जास्त बोर्ड तेवढा जास्त पैसा.. पैसा मिळत असेल कर कोणीही सहज बोर्ड लावायला तयार होतात, म्हणुनच पार किराणा दुकानापासुन पानटपरी चहा टपरी झेरॉक्स सेंटर पासुन ते पार पिठाच्या गिरणीवर सुद्धा त्यांचे बोर्ड दिसतात.
एवढी सगळी जाहीरात बघुन खुप लोक आहेत जे ओप्पो वीवो चे फँन झालेत अजुन एक कारण म्हणजे सेल्फी कँमेरा.. बाकी मोबाईल्सचेही कँमेरे मस्त आहेत पण ओप्पो वीवो सेल्फी एक्स्पर्ट म्हणुन त्यांचा ब्रँड झालाय. मार्केटच्या परिस्थितीचे निरिक्षण करता मार्केटमधे अजुनही सँमसंग एक नंबरला आहे, ओप्पो दोन नंबरला आणि वीवो तीन नंबर ला.. लवकरच कदाचीच ओप्पो सँमसंग क्रॉसही करेल..
दुकानात गेल्यावर ओप्पो वीवो घ्या म्हणुन जबरदस्ती..!
सँमसंग रिटेल दुकानदारांना खुप कमी कमिशन देतात, जवळपास फक्त 3-5% आणि ओप्पो वीवो वाले रिटेल दुकानदारांना 15% च्या आसपास कमिशन देतात सोबत फ्री गिफ्ट्स, ऑफर्स अजुन बरंच काही..
म्हणुन दुकानदार आपल्याला ओप्पो वीवोच घ्या म्हणुन रट लावतात..

तर मग एवढं सगळं करण्यासाठी पैसा कुठुन येतो ?
हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की हा पैसा कुठुन येतोय एवढा खर्च कंपनीला कसा परवडतो.. ??

याचं उत्तर खुप सोपं आहे.. जर तुम्ही मोबाईल घेताना प्रोसेसर, रँम, बैटरी(mah), मायक्रोचिप ह्या गोष्टी बघुन घेत असाल तर तुम्हाला हे उत्तर माहीत असणार पण जर तुम्ही फक्त कँमेऱ्याकडे बघुन ओप्पो वीवो फोन घेत असाल तर अभिनंदन तुम्हाला ओप्पो वीवोने गंडवलंय/मस्तपैकी चुना लावलाय.. 

ओप्पो आणि वीवोचा कोणताही मोबाईल घ्या तो मोबाईल त्याच्या मुळ किमतीपेक्षा 20 पट महाग विकतात, ज्या मोबाईलची किंमत 12 ते 13 हजार असायला पाहीजे तो मोबाईल ते 18-20 हजार ला विकतात, इथेच जाहीरातीचे पैसे वसुल करुन घेतात.. म्हणुन त्यांच्या जाहीरातीचे बजेट हे 2200 करोड पर्यंच पोहोचत आहे आणि त्याही पेक्षा पुढे जाईल. बरं एवढं पैसे घेउनही ते तुम्हाला जुन्या टेक्नॉलॉजीचे फोन देत आहेत, त्याच किमतीमधे तुम्हाला दुसऱ्या कंपनीचा लेटेस्ट टेक्नॉलॉजीवाला फोन मिळतो.

तर ही सगळी शाळा अशी आहे ..
काही विचार कदाचित कोणाला पटणार नाहीत पण ओप्पो आणि वीवो कचरा फोन आहेत विश्वास नसेल तर Youtube वर जाऊन सर्च करुन बघा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here