मालिकेत फौजी ची भूमिका करणारा विक्या खऱ्या आयुष्यात काय बोलतो फौजी बद्दल…?? वाचा नक्कीच वाचून तुम्हीही चक्रावून जाल

0
1660

महाराष्ट्रात वेगवेगळ्या संस्कृती आपण पाहतो त्याच प्रमाणे लष्करीसंस्कृती सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आहे. सैन्यात भरती होणारे कित्येकसे जवान हे महाराष्ट्राच्या मातीतले असतात. झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली लागिरं झालं जी ही मालिका फौजींच्या आयुष्यावर आधारित आहे.

या मालिकेतील सर्व पात्र हे भूमिकेत जीव ओतून आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहे. यातील एक पात्र म्हणजे “विक्रम फौजी” म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका विक्या!

विक्रम म्हणजेच निखिल चव्हाण “लागीर झालं जी” या मालिकेतील नुकताच भरती झालेल्या फौजीची भूमिका पार पाडत आहे. या मालिकेपूर्वी त्याचे आयुष्य एका साधारण तरुणासारखेच होते, पण देशभक्तीची भावना ही नेहमीच त्याचा मनात होती. निखिलच्या मनात फौजीबद्दलचा आदर आणि प्रेम यामुळेच त्याच्या रील आयुष्यात “फौजी” ची भूमिका पार पाडण्यात तो यशस्वी झाला आहे.

लहानपणी झेंडावंदनसाठी सर्वात प्रथम उभा राहणारा निखिलला कधीतरी फौजीचा पोशाख परिधान करण्याची संधीही मिळेल याचा स्वप्नात देखील विचार केला नव्हता.

प्रत्येक भारतीयांसाठी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन राष्ट्रीय सण आहेत आणि आपणही कधीतरी या सैनिकी परेडमध्ये सहभागी होऊन भारताचे नेतृत्व करावे ही इच्छा बालपणापासून होती. या मालिकेमुळे मला एका कर्तृत्ववान फौजीची भूमिका साकारायची संधी मिळाली. मी रियल नव्हे तर रील लाईफमध्ये फौजी जगत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे असे निखिल आपल्या भूमिकेबद्दल सांगतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here