मासिक पाळीमध्ये जास्त त्रास होत असेल तर ! हे घरगुती उपाय करा 

0
2354

महिलांमध्ये प्रत्येक त्रास सहन करण्याची क्षमता असते म्हणून आजपण आपण त्यांना देवाचे स्थान देतो. लहानपणा पासूनच प्रत्येक मुलीला किंवा महिलेला त्रास सहन करण्याची सवय झालेली असते . पहिले मासिकपाळी त्यानंतर लग्न आणि त्यानंतर आई होताना त्या असहाय वेदना ! एवढे असूनही प्रत्येक महिला तो त्रास सहन करते आणि घरातील आणि बाहेरील प्रत्येक काम करते. 

प्रत्येक महिलेला किंवा मुलीला मासिक पाळीच्या सुरवातीचे 5 दिवस खूप त्रास आणि अशक्तपणा जाणवतो . काही महिलांमध्ये हा त्रास कमी असतो तर काही मध्ये खूप जास्त त्रास असतो त्यात काही महिलांना उलटीचा त्रास सुद्धा होतो . अशा वेळेस प्रत्येक महिलेच्या हार्मोन्समध्ये बदल होत असतात त्यामुले त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो . आणि हा त्रास त्यांचा एकदाच त्रास नाही तर त्यांना प्रत्येक महिन्याला हा त्रास सहन करावा लागतो . त्यामुळे प्रत्येक महिलेला किंवा मुलीला खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. चुकूच्या आहारामुळे किंवा इतर कारणांमुळे हा त्रास वाढू पण शकतो . 

म्हणून आज आम्ही या आर्टिकल मार्फत आपणास काही खास घरघुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला होणाऱ्या मासिकपाळीच्या त्रासामध्ये किमान थोडा तरी फरक जाणवेल आणि तुमचा त्रास कमी होईल. मग वाट कसली बघताय सविस्तर माहितीसाठी पुढे वाचा. 

1) कामाचा वाढणारा तणाव कमी करा :- 

मासिक पाळीच्या काळ हा महिलांसाठी खूप कठीण आणि नाजूक काळ आहे कारण या दिवसात थकवा आणि त्रास खूप असतो . त्यामुळे घरातील किंवा ऑफिसमधील कामाचा तणाव कमी ठेवा , चिडचिड करणे टाळा , यामुळे तुम्हाला त्रास कमी होईल . कामाचा तणाव घेतल्यास त्रास अजून वाढेल आणि पोटात दुखणे , पाठ दुखणे हे त्रास जास्त जाणवतील.

2) उपवास ठेऊ नये :- 

मासिक पाळीच्या काळात महिलांना किंवा मुलींना मिनरल्स आणि व्हिटॅनिमची खूप आवश्यकता असते . त्यामुळे उपवास किंवा व्रत ठेवला तर जास्त धोक्याचे ठरते . अशाने त्रास जास्त वाढेल . 

3) पुरेपूर झोप घ्या :- 

मासिक पाळीच्या काळात थकवा आणि त्रास खूप जाणवतो . त्यामुळे तुमच्या शरीराला जास्त आरामाची गरज असते आणि आराम तेव्हाच होईल जेव्हा तुमची पुरेपूर झोप होईल. म्हणून मासिक पाळीच्या काळात किमान 7 ते 8 तास तरी झोप घेणे महत्वाचे आहे.

4) स्वचतेची काळजी घेणे :- 

मासिक पाळीच्या काळात स्वछतेची काळजी नक्की घ्यावी . जमल्यास कपड्याच्या ऐवजी मार्केटमध्ये मिळणारे सेनेटरी नॅपकिन म्हणजे पॅडचा वापर करावा . दिवसातून किमान 4 ते 5 वेळा सेनेटरी नॅपकिन बदलावा जेणेकरून ब्लड इन्फेकॅशनचा त्रास उदभवणार नाही .

5) फास्टफूड खाण्यावर बंधन :- 

बाजारात खूप प्रकारचे फास्टफूड खायला मिळतात आणि आपले मन पण आपल्या ताब्यात राहत नाही. किमान या 5 दिवसांकरिता बाहेरील खाद्य खाणे टाळावे . करण बाहेरील खाण्यात जास्त प्रमाणात गरम मसाले पदार्थ वापरले जातात त्यामुळे मासिकपाळीत होणार त्रास वाढू शकतो . त्यामुळे बाहेर खाणे शक्यतो टाळावे .

6) स्वतःला डॉक्टर समजू नका :- 

काही लोक स्वतःला डॉक्टर समजतात आणि छोट्या मोठ्या आजारांवर स्वतः औषधे घेतात. काही वेळेस डॉक्टरचा सल्ला न घेता औषधे घेतल्यास साईडइफेक्ट होण्याचे जास्त धोक्याचे असते. त्याऐवजी गरम पाण्याचा वापर करावा. जर जास्त त्रास होत असेल तर स्वतः डॉक्टर न बनता डॉक्टरला त्वरित संपर्क साधावा. 

लेख आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेयर करा मित्रानो ।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here