मासिक पाळी चालू असताना संबंध ठेवले तर काय परिणाम होतात ! बघा इथे

0
7687

भारतीय समाजात मासिक पाळी व स्त्री या विषया बद्दल अनेक समज-गैर समज आहेत. धार्मिक रुढी व परंपरांचा समाज जीवना वर पगडा आहे. जेथे या काळात स्त्रीलाच सार्‍यांपासुन लांब ठेवले जाते, तेथे मासिक पाळी दरम्यान सेक्स करावा की करू नये हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुमच्या मनातील अशाच काही शंका असतील त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

मासिक पाळी दरम्यान सेक्स केल्याने गर्भ धारणा होण्याची शक्यता तशी विरळच आहे. स्त्री शरीरात निरुपयोगी अंड जरी राहिले असले तरीही या काळात गर्भाशयातील त्वचेचे अस्तर बाहेर फेकले जाण्याची प्रक्रिया सुरू असते. तसेच गर्भधारणे साठी आवश्यक असलेली हार्मोन्स या काळात शरीरात उपलब्ध नसतात त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते.
क्वचित प्रसंगी, जेव्हा मासिक पाळी दरम्यान सेक्स करून देखील गर्भधारणा झाल्याचा दावा  केला  जातो तेव्हा ते रक्त पाळी दरम्यान चे नसुन संभोग झाल्यानंतर बीज गर्भाशयातील अस्तराला चिकटल्याने झालेला रक्त प्रवाह असतो. 

म्हणूनच जर अनावश्यक गर्भधारणा टाळायची  असेल तर सुरक्षित सेक्सचा नेमका काळ जाणून घेणे गरजेचे आहे. मासिक पाळीच्या चक्रा मधल्या काही दिवसां मध्येच गर्भधारणा होऊ शकते. प्रत्येक स्त्री साठी पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. साधारणपणे पाळी येण्याच्या आधी 2 आठवड्याच्या सुमारास अंडोत्सर्जन होते. म्हणजेच स्त्रीच्या बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येते आणि बीज वाहिनी मध्ये 12-24 तास जिवंत राहते.

 

या काळात जर पुरुष बीजाशी त्याच्या संपर्क झाला तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. शक्यतो मासिक पाळी चालू असताना गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते. मात्र जर पाळीचं चक्र लहान असेल म्हणजेच जर पाळी तीन आठवड्यातच येत असेल तर कधी कधी पाळी संपता संपताच अंडोत्सर्जन होतं. त्यामुळे पाळीच्या काळात सेक्स केल्यावर गर्भधारणा होणारच नाही असं नक्की सांगता येत नाही. पाळी जर महिन्यानी किंवा त्याहून जास्त दिवसांनी येत असेल तर मात्र पाळीच्या काळाच दिवस जाण्याची शक्यता नसते. आपलं पाळी चक्र समजून घेतलं तर कोणत्या काळात दिवस जाऊ शकतात आणि ते कसं टाळता येईल हे ठरवता येऊ शकतं. मात्र कधी कधी हे अंदाज चुकू शकतात. 

त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी आणखी काय उपाय करता येतात याची माहिती नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी या लेखात दिली आहे. ती नक्की वाचा. जो पर्यंत तुम्हाला आत्मविश्वास वाटत नाही, तो पर्येत निरोध किंवा इतर गर्भ निरोधक पद्धत वापरा आणि प्रेग्नन्सी राहील का ही चिंता मनातून काढून टाका.

 
ऑर्गेझम वाढल्याने गर्भाशयाचे आकुंचन होते व वीर्या तील प्रोजेस्टेरॉन मुळे  रक्त प्रवाह वाढतो. एरवी मासिक पाळी दरम्यान ४-५ दिवसां पर्यंत होणारा  रक्त प्रवाह, संभोगा नंतर होणार्‍या अतिरिक्त रक्त प्रवाहा मुळे अचानक बंद होण्याची शक्यता असते.  त्यामुळे परिस्थिती नुसार तयार रहा. सुरक्षित प्रकारे सेक्स पोजिशन ने घ्या मासिक पाळी च्या दिवसात अधिकाधिक आनंद.
मासिक पाळी दरम्यान स्त्रिया मानसिक व शारिरीक बदलां मधून जात असतात. सतत मूड बदलणे, पोटात दुखणे, कंबर दुखी या सारख्या समस्यांशी झगडत असतात त्यामुळे त्या सेक्स करण्यासाठी फार राजी नसतात. मात्र पाळी दरम्यान स्त्रीयां मध्ये ऑर्गेझम (परमोच्च संभोगसुख) अधिक चांगले असते हे जर तुम्ही तुमच्या साथीदाराला पटवून देऊ शकलात तर त्या तयार होण्याची शक्यता अधिक असते. तसेच या काळात सेक्स केल्याने मासिक पाळी दरम्यान होणार्‍या वेदना व त्रासदेखील कमी होतो.  या कारणां साठी मासिक पाळी च्या दिवसात ‘सेक्स’ ठरतो फायदेशीर.
हा एक चुकीचा समज आहे की, या काळात सेक्स करताना सुरक्षेची काही गरज नाही. मासिक पाळी दरम्यान सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असली तरीही या दरम्यान केलेल्या सेक्स मुळे लैंगिक आजार व जंतू संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. म्हणून सेक्स दरम्यान  कंडोम व सुरक्षेचे उपाय घेणे फार गरजेचे आहे. पण कंडोम वापरताना चूका अवश्य टाळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here