मृत शरीर जाळण्यासाठी लोक घाई का करतात ? कारण वाचून हैराण व्हाल ..

0
1809

जर एखादया व्यक्तीचा मृत्यू झाला तर , लोक त्याचा अंत्यसंस्कार लवकरात लवकर करण्याच्या मागे का लागतात. आपले महत्वाचे काम सोडून लोक या कामाला लवकर करण्यासाठी खूप घाई करतात. परंतु कुटुंबातील लोकांपेक्षा शेजारी पाजारी राहणाऱ्या लोकांना त्या व्यक्तीचे अंत्य संस्कार करण्याची खूप घाई असते ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल कधीतरी पण , असे काय होते की लोक मेलेल्या व्यक्तीच्या त्या शरीराला लवकरात लवकर जाळण्याची घाई करतात , का ते या कामाला जास्त वेळ घालवत नाही या मागे नक्कीच काहीतरी कारण असेलच ना ? म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की लोकांना मृत व्यक्तीचे अंत्य संस्कार करण्याची जास्त घाई का असते आणि त्या मागे नक्की काय शास्त्र किंवा काय कारण आहे. 

पुराणात लिहले आहे की , जेव्हा पर्यंत गावात किंवा गल्लीमध्ये मृत शरीर पडलेले असेल , तोपर्यंत घरामध्ये पूजा केली जात नाही किंवा करत नाही . गरुड पुराणानुसार लोक आपल्या घरात चूलसुद्धा पेटवू शकत नाही म्हणजे या परिस्थितीत कोणतेच शुभ कार्य केले जात नाही आणि जो पर्यंत मृत शरीर आहे तो पर्यंत अंघोळ सुद्धा करू शकत नाहीत तुम्ही . जो पर्यंत मृत शरीरावर अंत्यसंस्कार होत नाही तो पर्यंत लोकांचे काम थांबून असते म्हणून लोक अंत्यसंस्कार करण्याची घाई करतात. जो पर्यंत त्या मृत शरीराचे अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत लोक त्याची देखभाल करतात कारण जर एखाद्या प्राण्याने त्याला तोंड लावले तर तर त्याचा दुर्गंध येण्यास सुरुवात होते.

अंत्यसंस्कार केल्याने त्याचा फायदा मृत शरीराला आणि कुटुंबाला या दोघांना होतो दृष्ट व्यक्ती किंवा पापी व्यक्ती चे अंत्यसंस्कार केल्याने त्याला या पापातून मुक्ती मिळते. मृत शरीर जळण्यापुरी घरात आणि रस्त्यात पिंडदान केल्याने देवता आणि पिशाच खुश होतात आणि मृत शरीर अग्नीच्या चितेवर जाण्यास पूर्णपणे तयार असते . शरीर जळताना त्याचे हातपाय आणि सर्व शरीर कापडाने झाकून बांधले जाते कारण कुठल्याही वाईट गोष्टी त्या शरीरावर आपला ताबा मुळवू शकत नाहीत . मृत शरीर जाळण्यासाठी चंदन आणि तुळशीच्या लाकडांचा वापर करावा करण त्याने दुर्गंधी येत नाही . 

अंत्यसंस्कार चे सर्व कार्य गरुड पुराणात जसे दिले आहे तसेच केले पाहिजे कारण यामध्ये शरीर जळताना त्याचे डोके आणि पाय कोणत्या दिशेला हवे हे सांगितले गेले आहे कधी रडायचं आहे आणि कधी अस्ति (हाडे) गोळा करायच्या आहेत . लोक याचे पालन करत नाहीत म्हणून याचा परिणाम संपुर्ण कुटुंबावर होतो . तसे तर छोट्या मुलालाच त्या चितेस अग्नी देण्याचा अधिकार आहे त्यानंतर , भाऊ , पुतण्या , नातवंड हे अग्नी देऊ शकतात. यांच्या पैकी कोणी नसेल तर बायको किंवा मुलगी अग्नी देऊ शकते . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here