” मेरे रश्के कमर ” गाण्यावर तरूणींचा बोल्ड डान्स , इंटरनेटवर होतं आहे व्हायरल ! बघा हा व्हिडिओ .

0
2447

माहिती आणि कलेवरची मक्तेदारी मोडीत काढत इंटरनेटने सर्वसामान्यांसाठी एक नवे दालन खुले करून दिले. ज्यामुळे आपले ज्ञान, माहिती आणि कला जगभरातील अनेकांपर्यंत पोहोचवणे सोपे होऊन गेले. त्यातही युट्यूबने लोकांना नवा प्लॅटफॉर्म उपलबद्ध करून दिला. ज्याद्वारे अनेक लोक व्हिडिओ अपलोड करून आपली कला दाखवत आहेत.

नुकत्याच दोन मुलीही युट्यूबमुळे भलत्याच चर्चेत आल्या आहेत. विशेषतः सोशल मीडियावर या मुलींचा खास बोलबाला आहे. इतके सगळे सांगितल्यावर त्यांनी नेमके काय केले? हा प्रश्न मनात निर्माण होणे स्वाभाविक. तर, या मुलींनी ‘मेरे रश्के कमर’ या गाण्यात काहीसा हटके आणि बोल्ड अंदाजात डान्स केला आहे. आगोदर ‘मेरे रश्के कमर’ हे गाणे तुफान प्रसिद्ध त्यात या मुलींचा बोल्ड डान्स, त्यामुळे इंटरनेट यूजर्सचा कलेजा खलास नाही झाला तरच नवल.

‘मेरे रश्के कमर’ हे गाणे प्रसिद्ध सूफी गाय नुसरत फतेह अली खान यांनी गायले आहे. नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे. त्यामुळे त्यांनी गायलेली बहुतांश गाणी ही लोकप्रियच झाली आहेत. हे गाणे मिलन लुथरिया यांच्या बादशाहो या चित्रपटातही वापरण्यात आले आहे. हे गाणे तरूणाई आणि इंटरनेट यूजर्समध्ये इतके लोकप्रिय आहे की, तुम्ही हे गाणे युट्यूबला सर्च कराल तर, मुळ गाण्यापेक्षा अनेकांनी या गाण्यावर केलेले डान्सच तुम्हाला अधिक दिसतील.

व्हिडओत या गाण्यावर ज्या दोन तरूणी नाचताना दिसत आहेत तो व्हिडिओ कांची शाह नावाच्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. युट्यब चॅनलने दिलेल्या माहितीनुसार कांची शाह आणि सना पिंडारे यांनी हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ १७ लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. या व्हिडिओखाली कमेंट्सही प्रचंड आल्या आहेत.

बघा हा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here