अस्सल कोल्हापुरी स्वाद
कोल्हापूरची खाद्य संस्क्रुती आहारशास्त्र, आरोग्यशास्त्रातील निकषापेक्षा एक वेगळी संस्क्रुती. “ठसका”, “झटका”,”भुरका” ही खाद्य संस्क्रुतीची वैशिष्ठ्य. या वैशिष्ट्यांमागे तिखटातीलही एक गोडवा आहे. तो असा
साहित्य:
१) मटण १ किलो २) आलं-लसूण १ चमचे ३) ४ कांदा ४) तिखट ५) सुकं खोबरं १ वाटी ६) कोथिंबीर ७) भाजलेले तीळ १ चमचा ८) काजू वाटण अर्धा कप ९) खसखस १ चमचा १०) मीठ चवीनुसार ११) वेलची २ २) धनेजिरे पूड २ चमच १३) लवंगा ८ १४) दालचिनी ४ १५) मिरी ४ १६) हळद १७) टोमॅटो प्युरी अर्धी वाटी १८) तेल अर्धी वाटी
पूर्वतयारी:
१) मटण स्वच्छ धुवून घेणे. थोडा कांदा बारीक चिरून उरलेला कांदा उभा चिरून तळून घेणे.
२) आलं-लसूण वाटून घेणे. तीळ भाजून घेणे. सुकं खोबरं किसून तळून घेणे.
३) खसखस भाजून घेणे. काजूचे वाटण करून घेणे.
४) कांदा-खोबरं, तीळ, खसखस, लवंग, दालचिनी, मिरी, वेलची मिक्सरमध्ये वाटून घेणे.
कृती:
१) कुकरमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून चिरलेला कांदा परतावा. त्यात आलं-लसूण लावलेलं मटण टाकून परतून घ्यावं.
२) हळद, टोमॅटो प्युरी, मीठ टाकून पाणी टाकून मटण शिजवून घ्यावं.
३) दुस-या पातेल्यात तेल टाकून कांदा-खोबरं वाटण परतून घ्यावं.
४) शिजलेलं मटण व काजू वाटण टाकावं.
५) जरूरीनुसार कांदामसाला व मीठ-तिखट चवीनुसार टाकून शेवटी कोथिंबीर टाकावी.
६) गरमागरम लाल रस्सा भात किंवा ब्रेडबरोबर खायला द्यावा.
टीप: कोल्हापुरी कांदा मसाला असल्यास तो वापरू शकता.
———————————————————————-
पांढरा रस्सा :
साहित्य:
१) अर्धा किलो मटण २) वाटणासाठी-सुक खोबर अर्धी वाटी, ३) ३-४ लवंगा, ४) छोटा दालचिनीचा तुकडा, ५) एक चमचा खसखस, ६) २-३ मिर, ७) १०-१२ हिरव्या मिरच्या, ८) १ कांदा चिरलेला ९) २ चमचे आल लसुण पेस्ट. १० ) १ अख्खा ओला नारळ. ११ )चवीपुरते मिठ. १२ ) फोडणीसाठी-तेल,२ कांदे बारीक चिरलेले, तमालपत्र
कृती :
१) मटण स्वच्छ धुवून त्याला मिठ आणि आल-लसुण पेस्ट लावून १५ मिनिटे ठेवावे.
२) नंतर प्रेशर कुकरमध्ये फोडणीसाठी तेल गरम करावे.
३) त्यात तमालपत्र अणी बारीक चिरलेला कांदा घालावा. कांद्याचा रंग गुलाबीसर झाल्यावर त्यात मटण घालावे. थोडा वेळ झाकण ठेवावे.
मटणाला थोड पाणी सुटल्यावर मटणाचे पीस बुडेपर्यंत पाणी घालावे अणी ४ शिट्ट्या काढाव्यात.
४) मटण शिजेपर्यंत वरील वाटणासाठी दिलेले साहित्य एकत्र करून पाणी घालून बारीक वाटून घ्यावे आणि ओल्या नारळाचे दुध काढून घ्यावे.
५) एका पातेल्यात तेल गरम करावे. नंतर त्यात वाटण घालून छान परतून घ्यावे. वाटण भाजल्याचा वास अल्यावर त्यात शिजवलेले मटण घालावे. नारळाचे दुध घालून १ उकळ येऊ द्यावी.