वासना : एक अप्रतिम कथा वाचून शॉक बसेल एकदा जरूर वाचा असं सुद्धा घडू शकत जीवनात ??

0
21294

हि कथा शेवट्पर्यंत वाचा तेव्हा केळेल त्यामागील सत्य  

 निनाद आणि चेतना यांची हि कथा . निनादला ऑफिस थोडं लांब पडतं होतं पण तेवढ अॅडजस्ट केलं तर दिवस खूप उत्तम जात होते. काही दिवसांनी मात्र चेतना निनादला सांगायला लागली की तिला बंगल्यात कोणीतरी वावरतय असं सारखं वाटतं. कधी कधी किचनमधला नळ आपोआप चालू होतो किंवा लाईट चालू बंद होतात. निनाद तिला सांगायचा तुला एकटं रहायची सवय नाही ना त्यामुळे असेल असं कदाचित. तू जरा घराबाहेर पड म्हणजे तुला बरं वाटेल. 

एक दिवस चेतना सांगायला लागली मला त्या ललिताबाई परत भेटल्या आज.

 आम्ही खूप गप्पा मारत होतो. त्या इथे जवळच रहातात. त्यांनी मला त्यांच्या घरी यायचं आमंत्रणही दिलयं. काही दिवसांनी चेतनाच्या तक्रारीही बंद झाल्या. निनादला वाटलं चला बरं झालं चेतना इथे रुळली. पण तिच्यात झालेला बदल निनादला जाणवू लागला. तो जेव्हा ऑफिसमधून घरी यायचा तेव्हा ती एकदम तयार होऊन बसलेली असायची. 

सुरवातीला निनादने विचारलही, ‘कुठे बाहेर जातेयस का?’ तर म्हणाली, ‘नाही रे, तू येणार होतास नं, मग मी छान दिसायला नको का? आणि खळखळून हसली. चेतनला असं हसताना निनाद प्रथमच पहात होता. चेतनाचा कपड्यांचा चॉइसही बदलला. तिचं वागण बोलणंही आता मादक व्हायला लागलेलं. 

चाल मस्तानी व्हायला लागली. तिला पाहिलं की निनादला वाटायला लागलं ऑफिस बिफीस सोडून बस्स तिला मस्त मिठीत घेऊन दिवस घालवावा. आता तर त्यांच्या रात्रीही जरा जास्तच रंगायला लागल्या. कधी नव्हे ते चेतना आता पुढाकारही घ्यायला लागली होती. काही दिवसांनी मात्र निनादला या सर्व गोष्टींचा वीट यायला लागला. तरीही चेतनाचा रागरंग बघून तो तिला साद देत होता.

  एक दिवस मात्र निनाद तिला म्हणाला, ‘चेतना आज नको गं प्लीज. ऑफिसमध्ये खूप लोड होता. मी खूप दमलोय. पण चेतना काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. निनाद नको म्हणत असतानाही तिने त्याच्यावर जबरदस्ती केली. हळूहळू तर ती हिंसक व्हायला लागलेली. रात्रभर ती निनादला सोडतचं नव्हती. सकाळी ऑफिसमध्ये निनाद एकदम थकलेल्या अवस्थेत दिसायचा. त्याच्या मित्रांनीही त्याला चिडवायला सूरवात केली, रात्री झोप झाली नाही वाटत अशी. आता तर निनादला ऑफिसमधून सुटलं की घरी जावंसं वाटायचंच नाही. तो असाच इकडे तिकडे फिरत रहायचा. 

तो कितीही उशिरा घरी गेला तरी चेतनाच्या तावडीतून सुटायचा नाही. त्याच्यावर काय परिस्थिती ओढवली आहे हे तो कोणाला सांगूही शकत नव्हता. यातून कसं बाहेर पडायचं तेच त्याला कळतं नव्हतं. माझी निरागस हसरी चेतना मला किती जपत होती. कुठे हरवून गेली ती, ही कोणीतरी दुसरीच आहे असं त्याला वाटायला लागलं.

 शेवटी निनादने त्याच्या मित्राला सचिनला त्याची परिस्थिती सांगितली. सगळं ऐकून सचिनचा आपल्या कानावर विश्वास बसेना. शेवटी तो म्हणाला, आज मी तुझ्याबरोबर तुझ्या घरी येतो. काही मार्ग सुचतो का पाहूयात. सचिनला निनादबरोबर बघून चेतना नाराज झाली आणि काहीच न बोलता तडक बेडरूममध्ये निघून गेली ती बाहेरच आली नाही. सचिन आणि निनादला तिचं वागणं खटकलं पण ते काहीच बोलले नाहीत. निनादने किचनमध्ये जाऊन बघितलं तर जेवणही बनवलेलं नव्हतं.

 शेवटी त्या दोघांनीच खिचडी बनवली. निनाद चेतनाला जेवायला बोलवायला गेला. तब्येत बरी नाहीये का तुझी चेतना? ये थोडी गरम गरम खिचडी खा म्हणजे बरं वाटेल तुला,’ निनाद काळजीने म्हणाला. चेतना एकदम निनादच्या अंगावर धावून गेली. मला काय धाड भरलीये, ठणठ्णीत आहे मी.

 तू तुझ्या त्या मित्राला कशाला आणलयसं? तुला काय वाटलं, असं त्याला बरोबर आणलसं तर माझ्या तावडीतून सुटशील? शक्य नाही ते. आत ये. मला तू आत्ताच्या आता हवायस. निनादला आश्चर्य वाटलं तो म्हणाला ‘अग चेतना असं का वागतेयस? आज किती दिवसांनी सचिन आपल्या घरी आलाय. गेल्या वेळेला तो आलेला तेव्हा त्याचं किती भरभरून स्वागत केलेलंस तू ? खाली येवून थोडं बस नं आमच्याबरोबर. हे काय भलतचं चालू आहे तुझं? ते काही मला माहित नाही आधी तू आत ये, असं म्हणून चेतनाने निनादचा हात धरला. तिच्या हाताला झटकून निनाद खाली गेला.

 निनाद आणि सचिनने जेवून घेतलं आणि ते हॉलमध्येच गप्पा मारत बसले. अचानक हॉलमधला टीव्ही चालू झाला. निनादने तो बंद केला तरी परत टीव्ही चालू झाला. हे काय होतय निनाद वैतागून म्हणाला पण सचिनला आता भीती वाटायला लागली होती. तेवढ्यात वरती लटकलेल झुंबर खाली पडताना निनादला दिसलं त्याने पटकन सचिनला धक्का मारून बाजूला केलं नाहीतर ते झुंबर डोक्यात पडून सचिनचा कपाळमोक्षचं होणार असता. जोराचा वारा सुटला.

 बाहेरच्या झाडांची सळसळ ऐकू यायला लागली. जोरदार पाऊस सुरु झाला. ‘अवेळी पाऊस कसा काय सुरु झाला?’ सचिन म्हणाला. विजा जोरजोरात चमकायला लागल्या आणि घरातले लाईट गेले. मेणबत्ती शोधायला निनाद किचनमध्ये गेला. सचिन हॉलमध्ये बसून होता तेवढ्यात त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या अगदी जवळ उभं आहे. ती चेतना होती. चेतनने हळू हळू सचिनला स्पर्श करायला सुरवात केली.

 सचिन ओरडला ‘वहिनी तुम्ही हे काय करत आहात?’ त्याचा आवाज ऐकून निनाद बाहेर आला. त्याच्याकडे बघून चेतना म्हणाली ‘तू नही और सही. निनादच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली. तू माझी चेतना असूच शकत नाही. कोण आहेस तू? तो म्हणाला. चेतनाने विकट हास्य केलं आणि म्हणाली आता कसं बरोबर ओळखलसं. 

तुझी चेतना तर तुला कधीच सोडून गेली. आता फक्त मीच आहे ललिता. सचिन निनादला म्हणाला ‘चल निघ इथून’ आणि त्याला खेचत दरवाजापाशी घेऊन गेला पण दार काही उघडायला तयार नाही. ‘आता तुम्ही दोघंही माझ्या तावडीतून सुटून जाऊ शकत नाही’ असं म्हणून चेतना त्यांच्या जवळ यायला लागली. सचिन आणि निनादला काय करावं ते सुचेना. तेवढ्यात निनादने धावत जाऊन टेबलावरची सुरी उचलली आणि चेतनच्या शरीरावर सपासप वार केले. एक मोठी किंकाळी मारून चेतना तिथेच कोसळली.

 अशी हि वासना कथा आवडली तर जरूर शेअर करा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here