३१ जानेवारी २०१८ चंद्रग्रहण : चुकून सुद्धा ही कामे करू नका ! नाहीतर परिणाम काय होतील बघा

0
3362

⚜ *खग्रास चंद्रग्रहण* *माहिती*

दिनांक ३१-०१-२०१८ रोजी बुधवारी खग्रास चंद्रग्रहण आहेत हे ग्रहण भारतात दिसणार असले तर त्याचा स्पर्श देशाच्या अतिपूर्वेकडील भागातूनच दिसेल.इतर भागात ग्रस्त ग्रहण लागलेले चंद्रबिंब उदयाला येईल व चंद्रोदयानंतर खग्रास स्थिती संपून नंतर ग्रहणमोक्ष होईल.

वेध काळ आरंभ वेळ:-
हे ग्रहण दिवसाच्या चौथ्या प्रहरात असल्याने खग्रास या ग्रहणाचे वेध बुधवारी सूर्योदयापासून सुरू होतात,पण गर्भवती स्त्रीयांनी बाल, वृध्द, व रोगी यांनी दुपारी ११:३० वा. पासून वेध पळावेत.
पर्वकाल आरंभ वेळ दुपारी :- ०३:२३ मिनीट पासुन
खग्रास ग्रहण आरंभ वेळ:-
स्पर्श संध्याकाळी :- ५:१८ मीनीट
संमीलन :- ६:२१ मीनीट
मध्य :- ६:५९ मीनीट
उन्मीलन :- ७:३७ मीनीट
मोक्ष रात्री :- ८:४१ मीनीट

कर्क राशीत पुष्य आश्लेषा नक्षत्रावर होणारे हे ग्रहण मिथुन कर्क सिंह राशीच्या व्यक्तींना तसेच पुनर्वसु पुष्य आश्लेषा मघा या जन्मनक्षत्रांचे व्यक्तींना पिडक आहे.
पाण्याच्या संबंधित व्यवसाय व त्यावर उपजीविका करणार्‍या लोकांना त्रास होईल.


तसेच अतिवृष्टी, महापूर, समुद्री वादळे, रोगराई यापासून नुकसान व त्रास होईल.
लहान मुले, वृद्ध व गर्भवतीस्त्रियांनी ते पासून पाळावेत ही विनंती का आहे
गर्भवती महिलानी ग्रहण पाहू नये.
वेधातील आणि ग्रहण काळातील
नियम काय आहे?

भोजन करू नये, ग्रहण स्पर्श ते मोक्ष काळात मल- मूत्र विसर्जन,
भोजन, अभ्यंगस्नान,झोप, काम
विषयक सेवन शक्यतो टाळावे.
नदीत स्नान शुभ मानले जाते. यथा
शक्ती स्नान कुठच्याही नदीत गंगा
समजून करावी.मोक्षा नंतर च स्नान करावे.
ग्रहण कालावधीत काय करावे?
स्नान,दान,होम,तर्पण,श्राद्ध,मंत्र पुर्शचरण करावे .,ग्रहण लागण्याच्या सुरूवातीलाच दर्भ व तुलसीपत्र वापरले तर दोष लागणार नाहीत.
ग्रहणाबाबतीत बरेच गैरसमजुती आहेत.ग्रहण लागताच वेध लागते.त्यामुळे काहीच करु नये. हे खरेही आहे म्हणून काय करावे काय करु नये हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो.

१) ग्रहणात स्नान करुन पुजा,पाठ करावेत,मंत्र जप करावा.
२)ग्रहण काळात झोपू नये
३)घराची साफ सफाई करू नये.
४) गर्भवती स्त्रियांनी देवाची उपासना करावी.जप करावा.घरातून बाहेर जाऊ नये.व ग्रहण काळी काहीही खाऊ नये.नाहीतर बाळाला शारीरिक त्रास होतो.
५) ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे.
६)ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका.शांत रहा,ध्यान करा,गप्प बसा
७) ग्रहणकाळात झोपू नका नाहीतर रोग पकडतो.
८) ग्रहणकाळात लघुशंका, लघवी करु नये,घरात दरिद्रता येते.सावध रहा.
९) ग्रहणकाळात जो शौचास जातो त्यास पोटाचे विकार होतात.

१०) ग्रहणकाळात संभोग करु नये.नाहीतर डुक्कराच्या योनीत जन्म येतो.११) ग्रहणकाळात चोरी, फसवणे,करु नका नाहीतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागेल.
१२) ग्रहणकाळात जीवजंतू व कोणाची त्या करु नका.नाहीतर अनेक योनींत भटकावे लागेल.
१३) ग्रहणकाळात भोजन,माॅलीश करु नका,नाहीतर अनेक रोग शरीराला जखडतील.
१४) ग्रहणकाळात मौन पाळा,जप करा,ध्यान करा.याचे फल लाख पटीने आहे.
१५) ग्रहणकाळात सर्व कामे सोडून मौन व जप करा हे फार महत्त्वाचे आहे.
१६)सत्य ग्रहणशक्ती अगोदर खावून-पिऊन घ्यावे पण बाथरूम ला जावे लागेल असे घेऊ नये.
१७) नशापाणी,घाणेरडे वागणे करु नये.स्वैयपाक करु नये.धुने धुवू नये.पाणी भरु नये,
१८) भगवान ग्रहणकाळात भ्रूमध्यामध्ये ध्यान करावे.मुले बुद्धिमान होतात.
ग्रहणकाळात काय करावे काय करु नये ही माहिती मी दिली आहे.ही लक्षात ठेवा.हे सर्व शास्त्र परिहार आहे.यातून कोणतीही सूट नाही.


ग्रहण होते म्हणजे नेमके काय होते?
सूर्य या तार्‍याभोवती फिरणार्‍या पृथ्वी या ग्रहाभोवती तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतो. या सर्वाच्या भ्रमण पातळ्या वेगवेगळ्या आहेत. फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन त्याची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्या सारखे दिसते. ते सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले तर खग्रास चंद्रग्रहण आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेले तर ते खंडग्रास चंद्रग्रहण होय. अशी स्थिती येणे फक्त अमावास्येलाच शक्य असते. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, तर तिची सावली चंद्रावर पडते व चंद्राचे तेज कमी होते. त्यावेळी चंद्र तांबूस-भुरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर ते खग्रास चंद्रग्रहण घडते. चंद्राच्या काही भागांवर पृथ्वीछाया पडली तर ते खग्रास चंद्रग्रहण असते. असा चंद्रग्रहण योग फक्त पौर्णिमेलाच येऊ शकतो. णाचे अचूक अंदाज सर्वप्रथम कोणी वर्तविले?
राहू व केतू म्हणजे काय?
पृथ्वीकक्षेचे प्रतल ( पातळी ) व चंद्रकक्षेचे प्रतल हे वेगवेगळ्या प्रतलात आहेत. त्या प्रतलांच्या छेदन बिंदूंना राहू व केतू म्हणतात. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी उत्तरेकडे जाते तो पातबिंदू राहू होय. याउलट चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय. ज्या अमावास्येला-पौर्णिमेला चंद्र राहू अथवा केतू बिंदूजवळ असेल तेव्हाच ग्रहण घडू शकते. राहू व केतू हे पातबिंदू एकमेकांच्या बरोबर विरुद्ध अंगाला म्हणजे एकमेकांपासून १८० अंशावर असतात.


दर अमावस्या-पौर्णिमेला सूर्य-चंद्र ग्रहण का होत नाहीत?
अमावास्येला पृथ्वीसापेक्ष सूर्य व चंद्र एकाच दिशेला उगवतात. म्हणजेच त्यांच्यातील पूर्व-पश्चिम अंतर सर्वात कमी किंवा शून्य होते. पण भ्रमण कक्षेच्या पातळीतील फरकामुळे त्याचे दक्षिणोत्तर अंतर शिल्लक राहते. ते ज्या वेळा सर्वात कमी किंवा शून्य होते तेव्हाच ग्रहण घडू शकते.
सूर्य व पृथ्वी यांच्या, मध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण घडते. हे आपण पूर्वीl पाहिले आहे. सूर्य व चंद्र पृथ्वीसापेक्ष जरी पूर्वेलाच किंवा पश्चिमेलाच असेल तर चंद्र सूर्याच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस असेल, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडणारच नाही. म्हणजे सूर्यग्रहण होणार नाही. चंद्राची छाया पृथ्वीवर न पडता ती उत्तर किंवा दक्षिणेकडून जाईल. अशावेळी पृथ्वीवरून सूर्यग्रहण दिसणारच नाही. अशीच घटना पौर्णिमेला चंद्राबाबत घडते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडली तरच चंद्रग्रहण होईल. पण त्यासाठी त्यांचे पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अंतर शून्य किंवा कमीत कमी व्हायला हवे.
कधी पहाल चंद्राचे विलोभनीय रूप ?
बुधवार दि. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांपासून रात्री सात वाजून अडतीस मिनिटांपर्यंत पूर्व आकाशात साध्या डोळ्यांनी सुपर, ब्ल्यू, ब्लडमूनचे आपणास विलोभनीय दर्शन घेता येईल.
ब्ल्यूमून दिसणार


एका इंग्रजी महिन्यात ज्यावेळी दोन पौर्णिमा येतात त्यावेळी दुसर्या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यूमून ‘ म्हणतात. जरी त्याला ब्ल्यू मून म्हटले गेले असले तरी त्यावेळी चंद्र काही ‘ ब्ल्यू ‘ रंगाचा दिसत नाही. यावेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून ३१ जानेवारीच्या चंद्रास ‘ ब्ल्यूमून ‘ म्हटलेले आहे.
पुन्हा हा योग कधी येणार ?
आता यानंतर २६ मे २०२१ रोजी सुपरमून आणि चंद्रग्रहण असा योग येईल. ३१ डिसेंबर २०२८ रोजी ब्ल्यूमून आणि चंद्रग्रहण असा योग येईल. दि. ३१ जानेवारी २०३७ रोजी पुन्हा तिहेरी योग आल्याने सुपर-ब्ल्यू- ब्लड मूनचे दर्शन घेता येईल
१५२ वर्षांपूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी असाच चंद्रग्रहण, ब्ल्यूमून आणि सुपरमून दर्शनाचा योग आला होता.
सूपरमून म्हणजे काय ?
ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी त्याला ‘ सुपरमून ‘ म्हणतात. मात्र ‘ सुपरमून ‘ ही संज्ञा खगोलशास्त्रीय नाही. रिचर्ड नोले यांनी १९७९ मध्ये हे नाव दिले. अशावेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते.
चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. बुधवार ३१ जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५९ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसणार आहे.
राशिफल:-
खग्रास ग्रहणाचे जन्मराशि ग्रहणफळे :-
१) मेष:- मिश्र फळ
२) वृषभ :- मान हानि
३) मिथुन:- शुभ फल
४) कर्क:- भांडण/किरकिर
५) सिंह :- सौख्यदायक
६) कन्या:- चिंतावृद्धि
७) तुळ :- लक्ष्मीप्राप्ती
८) वृश्चिक:- मनस्ताप
९) धनु :- सुख प्राप्त
१०) मकर :- अति खर्च
११) कुंभ :- धनलाभ
१२) मीन :- आजार पिडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here