YouTube बद्दलच्या या १५ रोचक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

0
321

YouTube हि जगातील सर्वात मोठी व्हिडियो शेयरिंग वेबसाईट आहे. YouTube वर आपण घरबसल्या प्रत्येक प्रकारचे लाखो व्हिडियो पाहू शकतो. आज YouTube हा मनोरंजन आणि ज्ञानाचा एक खूप महत्वाचा स्रोत बनला आहे. TV वर एखाद कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्याला निर्धारित वेळेची वाट पाहावी लागतो पण YouTube वर तसे नाही आपण आपल्याला हवा तो व्हिडियो पाहिजे त्या वेळी पाहू शकतो आणि तेही अगदी मोफत !

आज YouTube हि जगातील तिसऱ्या क्रमांकाची वेबसाईट आहे. गुगल ने २००६ साली १६० करोड डॉलर मध्ये YouTube खरेदी केले परंतु करोडो रुपये किंमत असणाऱ्या या कंपनीची सुरुवात हे खूप रोचक आणि मनोरंजक पद्धतीने झाली होती हे तुम्हाला माहित आहे का ? चला जाणून घेऊया YouTube बद्दलच्या १५ मनोरंजक गोष्टी !

१) Paypal कंपनी मध्ये काम करणाऱ्या Ched Harli, Steve Chain आणि Jawed Kareem यांनी २००५ साली YouTube नावाची वेबसाईट बनवली.

२) jawed kareem यांना आपल्याकडील एक व्हिडियो आपल्या मित्रांसोबत शेयर करायचा होता पण त्याकाळी आतासारखी सुविधा नसल्याने ते खूप अवघड होते अशातच त्यांना एका व्हिडियो शेरिंग वेबसाईट ची कल्पना सुचली.

३) YouTube च्या स्थापनेनंतर १८ महिन्यातच Google ने YouTube ला १६० कोटी डॉलर ला विकत घेतले पण YouTube विकण्यापूर्वी त्यांनी google समोर एक अट ठेली होती आणि ती म्हणजे YouTube चे मुख्यालय हे नेहमी San Bruno, California इथेच राहील.

४) YouTube च्या स्थापनेनंतर एका महिन्यातच या वेबसाईट च्या यूजर्स ची संख्या हि ३० लाखांवर होती आणि तीन महिन्यातच ती तिप्पट वाढली आणि गूगले ने YouTube खरेदी करताना YouTube च्या यूजर्स ची संख्या हि ४ करोड इतकी होती.


५) २३ एप्रिल २००५ रोजी YouTube वर पहिला व्हिडियो अपलोड करण्यात आला होता ज्यामध्ये जावेद करीम हे एका प्राणिसंग्रहालयाची माहिती देत आहेत. या व्हिडियो चे नाव आहे “ME AT THE ZOO” 

 <iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/jNQXAC9IVRw” frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>

६) सुरुवातीला YouTube चे नाव हे UNIVERSAL TUBE & ROLLFORMS EQUIPMENT असे ठेवण्यात आले होते आणि नंतर ते UTubeonline असे करण्यात आले पण नंतर ‘UTube’ कंपनी सोबत झालेल्या वादामुळे त्यांनी आपले नाव YouTube असे ठेवले.

७) महिन्याला सुमारे १०० करोड लोक YouTube चा वापर करतात. एवढे ऍक्टिव्ह यूजर्स असून सुद्धा YouTube हि जगातील तिसऱ्या क्रमांकाची वेबसाईट आहे . पहिल्या क्रमांकावर google आणि दुसऱ्या क्रमांकावर Facebook नंतर तिसरा क्रमांक YouTube चा लागतो.

८) YouTube वर दार मिनिटाला १०० तासाहून अधिक वेळचे व्हिडियो अपलोड होतात.

९) YouTube वापर करणाऱ्यांपैकी ४४ % महिला आणि ५५ % पुरुष आहेत आणि जास्त यूजर्स हे १७ वर्षाखालील मुले आहेत जी कार्टून पाहण्यासाठी YouTube चा वापर करतात.

१०) YouTube वर दर सेकंदाला एक लाखाहून अधिक व्हिडियो पहिले जातात.

११) Luis Fonsi आणि Daddy Yankee यांचा Despacito हा व्हिडियो YouTube वरील सर्वात जास्त वेळा पहिला गेलेला व्हिडियो आहे हा व्हिडियो ४०० कोटींहून अधिक वेळा पहिला गेलेला आहे. याआधी हा रेकॉर्ड PSY च्या Gangnam Style या व्हिडियो च्या नावावर होता.

१२) YouTube च्या टॉप १०० व्हिडियोज पैकी ६० व्हिडियोज हे जर्मनी देशात बॅन केले गेले आहेत.

१३) YouTube ह्या टॉप १० चॅनेल्स ने २०१६ या वर्षात ३० कोटी ते ११० कोटी डॉलर्स ची कमाई केली होती २०१७ मध्ये ती दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१४) Justin Bieber चा Baby हा व्हिडियो YouTube वरील सर्वात जास्त Dislike केला गेलेला व्हिडियो आहे. हा व्हिडियो ६५ लाखाहून अधिक वेळा dislike केला गेला आहे. Gangnam Style च्या आधी हा व्हिडियो YouTube वरील सर्वात जास्त पाहिला गेलेला विडिओ होता. ज्याला १०० कोटींहून जास्त Views आहेत !

१५) अनेक देशांनी YouTube वर बॅन लावला आहे ज्या मध्य Brazil, Turky, Pakistan, Saudi Arabia, China, Iran आणि Indonesia सारख्या देशांचा समावेश होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here